स्टील १० हजारांनी स्वस्त! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? युद्धामुळे झाली होती दरवाढ; बांधकामाचे इतर साहित्य महागले

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना सर्वच बाबतीत महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. काही वस्तूंच्या किमती विविध कारणांमुळे वाढल्या तर काहींच्या किमती क्रुत्रिमरीत्या वाढविण्यात आल्या आहेत. जसे की स्टीलचा आणि युक्रेन-रशियाच्या युद्धाचा दूरपर्यंत संबंध नसतानाही व्यापाऱ्यांनी युद्धाचे कारण पुढे करून स्टीलचे दर मर्यादिपेक्षा वाढविले.

पाच हजार रुपये प्रतिक्विंटल मिळणारे स्टील ग्राहकांना ८ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करावे. लागले. यासह बांधकामाकरिता आवश्यक असलेले इतरही साहित्य महागल्याने घर बांधकाम हे दिवास्वप्नच ठरू लागले. कोरोनानंतर घराचे बांधकाम करणे सोयाचे ठरेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु सर्वच साहित्यांच्या किंमती दुपटीने वाढल्याने घर बांधकाम आवाक्याबाहेर गेले. युद्धानंतर स्टील व सिमेंटची आणखीच भाववाढ झाल्याने अडचणीत आणखीच भर पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here