

देवळी : गिरोली येथील हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पैशासाठी नातवाने आपल्या दोन मित्रांचे सहकार्य घेत आजोबाची हत्या केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. रुषिकेश नामक तरूण, महेश ऊर्फ मयूर गजानन कोडापे (१८) व हर्षद दिलीप पाराडकर (२०), सर्व रा. वर्धा असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी रुषिकेश हा मृत अरुण डहाके यांच्या मुलीचा मुलगा आहे. त्यानेच हत्येचा कट रचल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. हे प्रकरण पुढे कुठले नवीन वळण घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पुढील तपास ठाणेदार भानुदास पिदूरकर करीत आहेत.