

वर्धा : भरधाव वेगात येत असलेल्या चारचाकी वाहनाने निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. ही घटना 4 मार्चला रात्री 11.30 वाजता मगन संग्रहालय येथील चौफुलीवर घडली. दुचाकीस्वार सुमेध दिलीपराव शेंदेरे (24) रा. आदर्श नगर, सेवाग्राम हा त्याच्या मित्रासह दुचाकीने सिंदी मेघे येथे जात होता. दरम्यान शास्त्री चौकाकडून येणा-या चारचाकी अनोळखी वाहनाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात सुमेध शेंदरे आणि त्याचा मित्र वंश राऊत हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी अनोळखी चारचाकी चालकाविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.